पुण्यातील जुन्नर गावच्या शेतकऱ्याला टॉमेटोने केलं एका महिन्यात करोडपती

एकूण १८ एकर बागायती शेती असलेल्या दाम्पत्यांनी त्यातील १२ एकर मध्ये टोमॅटोचे पीक घेण्याचे ठरवले त्यात त्यांच्या तालुक्यातील कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ असलेलले गोपीनाथ दिवेकर व संजय नवले या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ह्यांनी २०२३ च्या एप्रिल महिन्यात त्यांच्या एकूण बागायती शेतीतील बारा एकर मध्ये ६२४२ सिजेंटा या जातीच्या साठहजार रोपांची त्यांनी लागवड केली. व त्याचे योग्य ते नियोजन करून त्या टोमॅटोचा बाग बहरात आणली. आणि ज्यावेळी ज्यावेळी त्यांच्या टोमॅटोला फळधारणा सुरु झाली अन त्याच वेळी मार्केट मध्ये टोमॅटो पिकाचे भाव हे आस्मानाला भिडले त्याचवेळी त्यांच्या गाव पासून जवळच असलेल्या नारायण गाव मार्केट मध्ये त्यांनी त्यांचा टोमॅटो विक्रीसाठी नेला.

पण नशिबाची साथ म्हणा आणि गेल्या महिन्यात एका टोमॅटोच्या क्रेटला ११०० ते २४५० रुपयांपर्यंत चा भाव त्यांना मिळाला तर एकाच दिवशी जवळपास ८५० ते ९०० क्रॅरेट्स टोमॅटो विकून त्यांना १८ लक्ष रुपयांची कामे केली.

 

आज पर्यंत १५ ते १८ हजार टोमॅटोच्या क्रेट विक्री केले ह्याच विक्रीतून त्यांनी जवळपास २ कोटींची उलाढाल केली ह्यातच त्यांनी लावलेल्या १२ एकर परिसरात टोमॅटो पीक लावणीसाठी ६० हजार टोमॅटो रोपं, औषधे, मांडव करणे, टोमॅटो बाधणी, फवारणी व बागांची मशागत ,तोडणी, क्रेट भरणे, मजुरी अशी ईश्वर गायकरांनी केलेल्या व्यवस्थापनातून एकूण ४० ते ४२ लाख रुपये भांडवल लागले त्याच भांडवलातून व योग्य नियोजन, मार्गदर्शन व नशिबाची साथ ह्याच्या जोरावर त्यांनी अवघ्या दोन महिण्यात २ कोटींच्या वर कमाई केली.

जुन्नर तालुक्यातील शेतकरी दांपत्य ईश्वर पत्नी सोनाली गायकर यांच्या सारखी मेहनत,अभ्यासपूर्ण मार्गदर्शन व नियोजन असेल, तर आपला शेतकरी नक्कीच करोडपती होऊ शकतो हे आज त्यांनी दाखवून दिल. जुन्नरतालुक्यात टोमॅटोला एकदम चांगला भाव मिळाल्याने अवघ्या महिनाभरात नारायणगाव बाजार समितीने जवळपास ८० कोटीं पेक्षा जास्त रुपयांची उलाढाल केली आहे.

 

या वर्षीच्या टोमॅटो उत्पादनाने या भागातील अनेक शेतकऱ्यांना लॉटरीच लागलीआहे. यामुळे १५ ते १८ शेतकरी हे कोट्याधीश तर अनेक शेतकरी हे लखपती झाले आहेत. यंदाच्या वर्षी ह्या टोमॅटोने आपल्या शेतकऱ्यांना तारले आहे. यामध्ये गायकर दाम्पत्य देखील करोडपती बनलंय.

साभार being मराठी

ग्लोबल न्युज नेटवर्क: