लसीकरण केंद्रावर भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये राडा !

मुंबई :  सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्यात मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या सुद्धा वाढवण्यात येत आहे. मात्र त्याच श्रेयवादावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये वाद होत असलेले चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार आता मुंबईतील अंधेरी येथील स्पोर्स्ट कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रसंगी घडला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी येथील स्पोर्स्ट कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आज सकाळच्या सुमारास कार्यक्रम पार पडला. पण यावेळी लस देण्यावरून भाजप भाजप आमदार भारती लव्हेकर, नगरसेवक योगीराज दाभाडेकर, भाजपच्या रंजना पाटील आणि शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांच्यात बाचाबाची झाली.हा वाद इतका विकोपाला गेला की कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी सुद्धा झाली. यामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या वादावादीनंतर भारती लव्हेकर या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या आहे. भाजपचे आमदार आणि नगरसेवक मनपाच्या कार्यक्रमात येऊन गोंधळ घालतात, श्रेय लाटण्याचं काम करतात, असा आरोप शिवसेना नगरसेवक राजूल पटेल यांनी केला आहे. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Global News Marathi: