कोरोना व्हायरस; आपले कोण पराय कोण? वाचा विशेष लेख

कोरोना व्हायरस; आपले कोण पराय कोण? वाचा विशेष लेख

कोरोना व्हायरस आला आणि त्यानं सर्वांना घाबरवून सोडलं असून सगळे आज धास्तावले आहेत. आज या कोरोना व्हायरसनं देशाला चिंतेत टाकले असून या व्हायरसमुळं मृतांची संख्या कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहे.

कोरोना व्हायरस हा अतिशय गंभीर अशा स्वरुपाचा आजार असून या आजारानं सर्वांच्या मनात धडकी भरत अाहे. त्यातच हा आजार संसर्गजन्य असल्यानं या आजाराचा परिणाम म्हणून या आजारानं आपल्याला विचार करायला लावलंय. त्यातच भलीभली ही मंडळी ज्या लोकांना आपण आपले समजतो. ती माणसं आज हा आजार होवू नये म्हणून आपले चांगले संबंधही दुरावतात. त्यातच आता लोकांवर आपले कोण आणि पराये कोण असे म्हणण्याची पाळी आली आहे.

आज याच कोरोना आजाराची एवढी भीती आहे की तो आजार कोणालाही सोडत नाही. त्यातच तो डॉक्टर, परीचारीका व पोलिसांनाही सोडत नाही. अशावेळी ह्या आजाराचा धोका असतांनाही पोलिस रस्त्यावर कोणी निघू नये म्हणून लोकांना मार्गदर्शन करीत असतात. तरीही लोकं त्यांचं न ऐकता लपूनचोरुन बाहेर निघतातच. तसेच डॉक्टर, परीचारीका आणि एकुण रुग्णालयातील कर्मचारी हे कोरोनाचा धोका असूनही प्रत्यक्ष रुग्णांची सेवा करीत अाहेत. ते रुग्णांना हात तर लावतातच. शिवाय आपल्या बोलण्यातून आधारही देत अाहेत. विशेष सांगायचं म्हणजे तेच आपले जवळचे नातेवाईक अाहेत. कोरोना व्हायरस हा जरी संसर्गजन्य आजार असला तरी काही लोक हे आपल्या छातीला माती लावून त्या आजारालाही न भीता रुग्णांची सेवा करीत अाहेत. ते आपल्या दुरच्याच संबंधातील असले तरी. तसं पाहिल्यास खरं तर हिच मंडळी आपली नातेवाईक आहेत… आपली माणसं आहेत.

कोरोनानं आपले कोण व पराये कोण हे ओळखण्याची वेळ आणलेली असून हा कोरोना संपला तरी लोकांनी विचार करुन पुढली रणनीती आपले कोण व पराये कोण अशीच ठेवावी. कोरोना व्हायरसनं उद्भवणारा आजार हा अतिभयंकर जरी असला तरी ज्यानं हा धोका पत्करुन आपल्याला आज मदत केली. ती माणसं लोकांनी पुढं कोरोना गेल्यावरही आपली मानावी.तसं पाहिलं तर या लाटेत कोण वाचतं आणि मरतं हे सांगता येत नाही. काही माणसं आजही हा आजार महाभयंकर असतांनाही ती आपल्या कामात पडत अाहेत. ती दुरची माणसं आहेत. पण ती दूरची असली तरी आजही आपल्या जवळची असल्यासारखी वागत आहेत.

महत्वाचं म्हणजे कोरोनानं आज माणसाला विचार करायला भाग पाडलं. आज याच कोरोनानं आपले कोण व पराये कोण ओळखण्याची पाळी आणलीय. कोरोना हा जरी गंभीर आजार जरी असला तरी याच कोरोनानं सर्व गोष्टी शिकवल्या आहेत. हा कोरोना हा आजार गंभीर जरी असला तरी या आजारानं माणुसकीच शिकवली आहे असं म्हणतांना आतिशयोक्ती वाटत नाही. कृपया आपले ओळखणे शिका हेच कोरोना व्हायरस सांगत असावे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: