गोवा | गोवा विधानसभा निवडणुकीतील माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजी मतदार संघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. स्व-पक्षाने अर्थात भाजपने त्यांना पणजी ऐवजी इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले असल्याचे गोव्याचे भाजपा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.
मात्र उत्पल यांनी दोन्ही पर्याय बाजूला सारून त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना काँग्रेस नेते उदय मडकईकरही उत्पल यांच्यासोबत होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले. असे असतानाच आता उत्पल पर्रिकरांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं.
गोव्याच्या राजकारणात अशी विचित्र परिस्थिती दिसून आली की माझ्यापुढे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. नाईलाज म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. पणजी मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा माझा प्रयत्न असेल. परिस्थितीमुळे मी नाईलाजाने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. पणजीच्या लोकांना उमेदवारांच्या यादीत चांगले पर्याय मिळावेत म्हणून मी अर्ज दाखल केला आहे असे त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना बोलून दाखवीले होते.