अमेरिकेने केले मुंबई मॉडेलचे कौतुक, कोरोना रोखण्यात मनपाने राबवलेल्या उपाययोजनांचे होत आहे कौतुक |

 

मुंबई | मागच्या मार्च महिन्यात संपुन देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला होता. त्यात मुंबईतील दाटीवाटीच्या वस्ती समजल्या जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीत सुद्धा कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला होता.मात्र मुंबई मनपा आणि राज्य सरकारने राबवलेल्या उपाय-योजनांमुळे मुंबई सारख्या दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना रोखण्यात यश आले होते.

आता याच यशाचे अमेरिकेने सुद्धा कौतुक केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका राबवत असलेल्या मुंबई मॉडेलचे कौतुक आता अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाने केले आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य अर्थात ‘काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्’चे सदस्य जे. लुईस कोरिया यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून महापालिकेच्या कामगिरीचे कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुंबई महापालिकेने ट्रेसिंग,ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चतुर्सूत्री प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह वाढत्या रुग्णसंख्येसाठी युद्धपातळीवर जम्बो कोरोना रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती तर पालिका, राज्य व खासगी रुग्णालयांत केंद्रीय बेड नियोजन, रुग्णवाहिकांची उपलब्धता आणि या सर्वांवर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी वॉररूम आणि डॅशबोर्डच्या सुविधा उभारल्या. कोरोना नियंत्रणाच्या या मुंबई मॉडेलचे कौतुक आता अमेरिकेने केले आहे.

Team Global News Marathi: