.मग मोहन भागवत आणि ओवैसी यांचा डीएनए एकच – काँग्रेस

 

नवी दिल्ली | भारतातील सर्व नागरिकांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे हिंदु आणि मुस्लीम यांच्यात कोणताच भेदभाव नाही, असे वक्तव्य आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केले होते. यावर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हटले आहे की, ‘जर हिंदु आणि मुस्लिमांचा डीएनए एक आहे, तर धर्म परिवर्तन आणि लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची काय गरज आहे ? तसेच, त्यांनी मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवैसींचा डीएनएदेखील एकच असल्याचे म्हटले.’

तसेच मोहन भागवत यांचे विधान खरे आहे असे मानायचे असेल तर याआधी त्यांनी मुस्लिमांवर अत्याचार करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवून दाखवावे. असं म्हणत आपल मत मांडल होत.

दरम्यान, मोहन भागवत यांनी गाझियाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात बोलताना भारतातील सर्व नागरिकांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे हिंदु आणि मुस्लीम यांच्यात कोणताच भेदभाव नाही हे वक्तव्य केले होते. मोहन भागवत यांनी जी विधाने केली आहेत ती विधाने त्यांनी मोदी शहा यांनाही ऐकवली पाहिजेत, असेही दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: