केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले मुंबई आयुक्तांचे कौतुक !

मुंबई : मुंबईत लस घेण्यसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रावर गर्दी उसळताना दिसत आहे. त्यात अनेकांना लस घेता येत नसल्याकारणामुळे अनेकांना परत माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे मुंबईत अजून लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा निर्णय मुंबई घेण्यात आला. त्यासाठी मोठ्या पार्किंगची जागा महापालिकेनं ताब्यात घेत लसीकरण सुरु केलं आहे. यावरूनच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

त्यातच राज्यात कोरोना लस आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना गडकरी यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. येत्या 5 ते 6 दिवसांत राज्यातील लसींची अडचण दूर होईल, अशी माहिती त्यांनी रविवारी दिली आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचे ऑडिट करणं गरजेचे आहे. कारण 30 – 30 टक्के ऑक्सिजन लिकेज निघत असल्याचंही ते म्हणाले. पुढे लसीच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या मुद्द्यावर सुद्धा भाष्य केले आहे.

राज्यात लसीकरणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. श्रेय लाटण्यासाठी विविध पक्षाते नेते आणि कार्यकर्ते धडपड करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे लसीकरणाबाबत राजकारण करु नका, असा सल्ला गडकरी यांनी दिला आहे. बोर्ड लावा पण झेंडे लावण्याची गरज नाही. लोकांना माहिती आहे. राजकारण केलेलं लोकांना आवडत नाही. तुम्ही जे करणार आहात त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे. नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं हे राजकारण नाही, असा सल्लाही गडकरींनी दिला आहे.

Team Global News Marathi: