संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही तसेच सामना सुद्धा वाचत नाही – नाना पटोले

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळवून महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले होते. मात्र अनेकवेळा या तिन्ही पक्षात खटके उडत असलेले पाहायला मिळाले होते. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्द्यावरून आघाडीत मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसलाही चांगलेच खडेबोल सुनावले होते. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबाबत नाराजी देखील नाना पटोले यांनी बोलावून दाखवली आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना देखील वाचत नाही. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित संजय राऊत यांना माहिती नसावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं भयावह चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, भाजपला 24 तास फक्त सत्ता पाहिजे, देशात कोरोनाच्या चितेमध्ये लोक जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारात लागले होते, अशी टाकी नाना पटोले यांनी केली आहे.

Team Global News Marathi: