उद्धव ठाकरे यांना भारत जोडो यात्रेचं निमंत्रण, निलेश राणे यांनी उडवली खिल्ली

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जोरात सुरू आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय. लाखोंच्या संख्येनं लोक या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. आता लवकरच या यात्रेचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे. येत्या 7 नोव्हेंबर रोजी ही यात्रा नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा पाच दिवस मुक्काम असणार आहे. तर हिंगोली जिल्ह्यात चार दिवस यात्रेचा मुक्काम असणार आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 9 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच या यात्रेत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी एक व्यंगचित्र रिट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी एक व्यंगचित्र रिट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे व्यंगचित्र महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅंडलवरून पोस्ट करण्यात आलं होतं. या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या दिसत आहेत. एकीकडे भारत जोडो यात्रा दिसत आहे.

या व्यंगचित्रात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आहेत. ते आपल्या वडिलांना उद्धव ठाकरे यांना म्हणत आहेत की, ‘ बाबा इथलं झालं असेल तर तिकडे मुजरा घालायला चला’ असं व्यंगचित्र ट्विट करून निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. आता ठाकरे गट निलेश राणे यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Team Global News Marathi: