उद्धव ठाकरेंनी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या

 

दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पांचं मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंधात साजरा झालेला उत्सव यावेळी मात्र निर्बंधमुक्त आणि मोठ्या जल्लोषात साजरा झाला. उत्सवात यावेळी राजकीय रंग देखील पाहायला मिळाला. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून गणेश दर्शनाच्या माध्यमातून मंडळांना भेटीगाठी दिल्या गेल्या. भाजपाचे नेते आणि ज्यांच्या ट्विटची दखल प्रत्येक जण घेऊ लागला आहे असे मोहित कंबोज यांनी आज एक नवं ट्विट केलं आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांनी यावेळी गणेशोत्सव असो किंवा दहीहंडी दोन्ही सणांच्या शुभेच्छा जनतेला दिल्या नाहीत याची आठवण करुन दिली आहे.

श्री उद्धव ठाकरे जी यांनी यावेळी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. पण २.५ वर्षांनंतर हिंदुंनी यावेळी ज्या जल्लोषात उत्सव साजरा केला. त्यासाठी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हर हर महादेव”, असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे.

Team Global News Marathi: