उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा

 

खासदार गजानन कीर्तिकरांनी बांधलेल्या योगालय व बालसंस्कार केंद्राचे लोकार्पण झाले. गोरेगावातील या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम उपस्थित होते. यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. गद्दार म्हणणाऱ्या उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर तोंडसुख घेत रामदास कदमांनी गंभीर आरोप केले.

उद्धव ठाकरे खरे गद्दार, स्लो पाॅयझन असल्याची बोचरी टीका कदमांनी केली. सुषमा अंधारेंवरूनही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी मोठ्या संख्याने शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते मात्र या टीकेमुळेपुन्हा एकदा रामदास कदम उद्धव ठाकरे गटाच्या निष्णायव्हर आले आहे यापूर्वी सुद्धा आपल्या होम ग्राऊंडवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता,

उद्धव ठाकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी घासत असून, वरून बाळासाहेब बघत असतील, तर तेही म्हणत असतील की माझा मुलगा (उद्धव ठाकरे) शरद पवार आणि सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला. उद्धव ठाकरेंमुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही अशा शब्दात रामदास कदमांनी हल्लाबोल केला.

Team Global News Marathi: