२०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय

 

नवी दिल्ली | खासदार वरुण गांधी गेल्या अनेक दिवसांपासून मोदी सरकारच्या कामगिरीवर टीका करताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.ते काँग्रेसमध्ये अथवा समाजवादी पक्षासोबत जाऊ शकतात, असा कयासही लावला जात आहे. मात्र यातच, आता वरुण गांधी यांचा नवा प्लॅन समोर आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते आपला नवा पक्ष स्थापन करू शकतात, असा दावाही अनेक वृत्तांमध्ये केला जात आहे.

वरून गांधी लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी भारतीय जनता पक्ष सोडून आपली आई मेनका गांधी यांच्यासह नव्या पक्षाची स्थापना करू शकतात. मात्र, यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट नाही. पण, माध्यामांतील वृत्तांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा केला जात आहे की वरून गांधी नवा पक्ष स्थापन करू शकतात अशी माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून पुढे आली आहे.

वरून गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. राहुल गांधी यांनी वेगळी विचारधारा म्हणत वरून यांच्या काँग्रेस प्रवेशास नकार दिला असला तरी, आता प्रियांका गांधी यांची या प्रकरणात एंट्री झाली आहे. त्या वरून यांच्यासोबत बोलत आहेत. वरुण आणि प्रियंका यांचे संबंध चांगले आहेत आणि त्यांच्यात बोलणे होत असते. मात्र आता त्यांच्यात राजकीय चर्चाही होत आहेत.

Team Global News Marathi: