मुंबई | राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार भाजपने पाडून दाखवावंच, असा आव्हान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाहते भारतीय जनता पक्षाला दिला होते. आता मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे घडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
ते शनिवारी मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी सारखा ‘ सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा’ चा धोशा का लावला आहे. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा, असे फडणवीस यांनी म्हटले.
पुढे फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. पण त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे. अनेकदा शिवसेनेकडे उमेदवार नव्हता तेव्हा भाजपने त्यांना उमेदवार दिल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे विचारांचं सोनं नव्हतं. तर ते मुख्यमंत्र्यांच नैराश्य (फ्रर्स्टट्रेशन) होतं. असंगाशी संग केलात की असंच होणार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.