उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक माहिती आली समोर! शिवसेना नाव कायम राहणार

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही.

मात्र नवडणूक आयोगाकडून दिलासादायक बातमी समोर आल्याचे वृत्त शिवसेनेकडून देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने फक्त धनुष्यबाण हे चिन्हचं गोठवलं आहे, शिवसेना हे नाव कायम असणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिली. केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. शिवसेना आणि एकनाथ शिंदे पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेता येईल. शिवसेना नाव वापरता येईल परंतु, त्याला काही जोडावे लागेल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली. तसंच, शिवसेना नावासमोर आता दुसरे एखादे सुटसुटीत नाव जोडावे लागणार आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा तात्पुरता आहे.

Team Global News Marathi: