राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर 

 

 

मुंबई |  २०१५ साली वांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंत याच गुरुवारी जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत केले. तसेच आकलनगर येथे कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संवाद साधतानात नारायण राणे आणि तृप्ती सावंत एकाच व्यासपीठावर उभे असलेले दिसून आले होते.

 

तर दुसरीकडे  नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. यावर आता सेनेच्या माजी आमदार आणि भाजपा नेत्या तृप्ती सेवनात यांनी सेनेला टोला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते, असे तृप्ती सावंत यांनी म्हटले.

 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बाळासाहेब हेच आमचं दैवत आहे. आपला जुना शिवसैनिक मोठा होतोय, याचं स्वागत व्हायला हवं. आमचं आणि बाळासाहेबांचं नातं अतूट आहे, ते कधीच संपणार नाही. आम्ही शिवसेनेपासून दुरावलो असलो तरी बाळासाहेबांपासून कधीही दुरावणार नाही, असे तृप्ती सावंत यांनी सांगितले.

Team Global News Marathi: