मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेनेच्या हातात राहणार नाही, राणेंचा थेट निशाणा

 

 

महाराष्ट्रातील भाजपचे चार केंद्रीय नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. त्यातच आज पासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जण आशीर्वाद दौरा मुंबईतून सुरु होणार आहे.

 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत. आपल्याला आपलं राज्य वाचवाचयं, पुन्हा भाजपचं सरकार आणायचंय, राज्य उद्धवस्त करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचायचंय”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आजपासून नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. मुंबईत कला नगर येथे आयोजित पहिल्या भाषणात त्यांनी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला.

 

पुढे बोलताना राणे म्हणाले की, मी जिथं उभा आहे, तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे, काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिज्यात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे, कुणीही विनाकारण आपल्याला झेपणार नाहीत, अशा गोष्टी बोलू नयेत. अन्यथा येणाऱ्या महापालिकेत गेल्या 2 वर्षात तुम्ही येथील जनतेला कसं पाठीमागे टाकंल, याचा उद्धार होणारच आहे. पण, येथील जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही, असे राणेंनी म्हटले

Team Global News Marathi: