ट्रेनला लटकलेल्या तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

 

मुंबई | रेल्वे अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या डब्यांना लटकू नका असं वारंवार आवाहन केले जाते मात्र तरीही काही अतिउत्साही तरुण ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करत असतात. याचा परिणाम अनेक अपघातात प्रवाशांचा मृत्यू होतो. त्यामुळे कोणीही नको तो स्टंट करू नये असं सांगितले जाते.

दादरला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमधील एक तरुण गाडीतून खाली पडला. यावेळी गाडीची गतीही जास्त होती. आज साधारण 9.30 वाजता कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चालत्या ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या डब्यांना लटकू नका असं आवाहन केले आहे.

Team Global News Marathi: