शिवसेनेतील अंतर्गत वादावर हेमांगी कवीची सूचक पोस्ट

 

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे समर्थक ४० हून अधिक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे असं म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली असून सरकार टिकणार की कोसळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

तर दुसरीकडे मी मुख्यमंत्री नको असेन तर मला येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. याच दरम्यान मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवीने यावर भाष्य केलं आहे.

हेमांगी कवी नेहमीच राजकीय घडामोडींवर आपलं मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. यावेळी तिने आता कुणाला खरा वाघ म्हणायचं? अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर यूजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून सध्या त्याच्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे.

Team Global News Marathi: