आजचे राशिभविष्य: कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी; वाचा सविस्तर-

ग्लोबल न्यूज ​- आजचे पंचांग. वार – शनिवार 20 मार्च 2021

शुभाशुभ विचार — सामान्य दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – रोहिणी 16.45 पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ.

 

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. कुणालाही मोफत सल्ले वाटप मात्र करू नका.

वृषभ – ( शुभ रंग – आकाशी)

आज तुम्हाला संयमाची गरज असून अतिउत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील. मुलांनी आज्ञेत रहावे.

मिथुन – ( शुभ रंग- मरून)

व्यावसायिक अडचणींवर जिद्दीने मात कराल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर विसंबून राहू नका. गृहिणींनी झाकली मूठ झकुनच ठेवलेली बरी. खर्च आवाक्‍याबाहेर जाणार आहे.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा)

एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपल्या प्रयत्नांना दैवाची हमखास साथ मिळेल. आपली अपुरी स्वप्ने साकार होतील.

सिंह – ( शुभ रंग- पिस्ता)

उद्योग व्यवसायात तुमचा प्रगतिरथ वेगवान राहील. आज तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले काही निर्णय अचूक ठरणार आहेत. एखाद्या जिवलग मित्रास तुमच्या मदतीची गरज भासू शकेल.

 

कन्या – ( शुभ रंग – लाल )

आज कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळताना नाकीनऊ येतील. वाद विवादात तटस्थतेचे धोरण स्वीकारा.

तूळ – (शुभ रंग- मोरपंखी)

आज काही कारणाने घरात थोर मंडळींशी मतभेद होतील. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.

वृश्चिक – ( शुभ रंग- क्रीम)

उद्योग-धंद्यात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. मित्रांमध्ये आज काही वैचारिक मतभेद होतील. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

धनु – (शुभ रंग- जांभळा)

अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची यशाकडे वाटचाल सुरूच आहे. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. दुपारनंतर थोडी शारीरिक अस्वस्थता जाणवेल.

मकर – ( शुभ रंग – केशरी)

उच्च शिक्षितांची ध्येय साध्य होतील. नवोदित कलाकारांना चांगल्या प्रोजेक्टचे प्रस्ताव येतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसून येईल. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील.

कुंभ – ( शुभ रंग – गुलाबी)

कुटुंबात काही मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधान देईल. संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. आनंदी दिवस.

मीन – ( शुभ रंग- चंदेरी)

शुल्लक कारणाने दुरावलेली भावंडे एकत्र येतील. आज महत्त्वाच्या कामासाठी पायपीट करावी लागेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: