औरंगाबाद शहरातील शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर माजी खासदार आणि आमदारामध्ये चांगलीच जुंपली

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा शिवसेना पक्षातील अंतर्गद वाद चव्हाट्यावर आले आहेत. येन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या तोंडावर पक्षात सुरु असलेल्या गटबाजीमुळे निवडणुकीला शिवसेनेला जबर फटका बसणार असेच चित्र दिसून येत आहे.

त्यात शिवसेना आमदार, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. खैरेंनी दहा वर्षात माझ्याबाबत २४ ते २५ तक्रारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केलेल्या आहेत. गुरुवारी खैरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील धागा पकडून शुक्रवारी दानवेंनी पत्रकार परिषदेमध्ये हा गौप्यस्फोट केला.

शेतकरी विकास पॅनलतर्फे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दानवे बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीचा प्रचार आता जोरदार शिगेला पोहोचला आहे. शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे हे शिवसेनेमध्ये माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे का? असा सवाल देखील पत्रकारांसमोर उपस्थित केला होता.

या टीकेला उत्तर देताना आमदार दानवे म्हणाले की, पॅनलमध्ये शिवसेना नेते तथा राज्याचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह एकूण सहा नेते हे उमेदवार आहेत. यासह भाजपचे फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिष चव्हाण यांच्यासह सर्वच पक्षातील लोक आमच्या पॅनलमध्ये असल्याचेही दानवे यांनी या वेळी सांगितले.

Team Global News Marathi: