आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

आजचे पंचांग  वार – शनिवार, 12 जून  2021

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र -आद्रा 16.56 पर्यंत नंतर पुनर्वसु.
नक्षत्र पया- चांदी.
चंद्र राशी –  मिथुन

शनिवार 12 जून रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. शनिवारच्या या अशुभ योगामुळे 5 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार…

मेष : शुभ रंग : मरून| अंक : १
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदगच जास्त होईल. भावंडात सामंजस्य राहील.

वृषभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
कार्यक्षेत्रात मानसन्मान वाढेल. अनपेक्षित हाेणारे लाभ मनाला दिलासा देतील. दैवाची साथ राहील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
आर्थिक सुबत्ता येईल. तुमचा उत्साह व कार्यक्षमता चांगली असेल. विरोधकांनाही आपलेसे कराल.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अती महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून तब्येतीकडेही लक्ष द्यावे.

सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
अनुकूल घटना तुमच्या आत्मविश्वासात भर घालतील. लॉकडाऊनमुळे रखडलेली कामे मार्गी लागतील.

कन्या : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. मित्र दिलेली अाश्वासने अजिबात पाळणार नाहीत.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक कामास प्राधान्य देणे आज हिताचे राहील.

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम| अंक : ६
मान-अपमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा.

धनु : शुभ रंग : लाल| अंक : ४
आज तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील.

मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : २
आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर मात्र वसूल होतील.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. मोहाचे प्रसंग टाळा. आज मौजमजा करण्याकडे तुमचा कल राहील.

मीन : शुभ रंग : निळा| अंक : १
तुम्ही उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: