एकनाथ खडसेंना जोरदार धक्का, संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश !

जळगाव | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे आज जळगाव दौऱ्यावर आले आहेत. तसेच ते आज लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सुरुवातीला ते जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळी महापालिकेशी निगडित प्रश्न, निधीची उपलब्धता, गटतट यासारख्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भाजप नगरसेवकांच्या विषयावरही खल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी भाजपच्या नगरसेवकांचा संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना प्रवेश होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत, विलास पारकर आदींसह पदाधिकारी उपस्थित असतील.

जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपायाचे नगरसेवक फोडून गिरीश महाजन यांच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला.

Team Global News Marathi: