गांधी घराण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे -सुनील केदार; पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

गांधी घराण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे -सुनील केदार

गांधी घराण्यावर प्रशचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलींद देवरा यांना लाज वाटली पाहिजे अशी टीका दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत .

काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा आणि गांधी कुटुंबातील व्यक्तीला पक्षाध्यक्ष पद घ्यायचे नसेल तर अन्य व्यक्तीची या पदावर निवड करावी, अशा आशयाचे एक पत्र काही नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाला पाठवले आहे. या पत्रावरुन आक्रमक होत, सुनील केदार यांनी ट्विटरद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे. सुनील केदार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी सोनिया गांधी यांचे मनापासून समर्थन करतो.

सोनिया गांधी अथवा गांधी कुटुंबातील व्यक्तीच्या नेतृत्वाबद्दल पक्षातीलच नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे लज्जास्पद आहे. राज्यातील ज्या नेत्यांनी हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी संपूर्ण गांधी कुटुंबीयांची माफी मागावी असे केदार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा आणि मुकुल वासनिक यांचा थेट नामोल्लेख करत केदार यांनी या तिघांनी माफी मागावी असे म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी तातडीने याबद्दल सोनिया गांधीची माफी मागितली पाहिजे,” असे ट्विट सुनील केदार यांनी केलं आहे. त्यासोबतच “जर त्यांनी सोनिया गांधींची माफी मागितली नाही, तर त्यांना राज्यात काँग्रेस कार्यकर्ते कुठेही फिरकू देणार नाहीत,” अशा इशारा त्यांनी या नेत्यांना दिला आहे.

राहुल गांधी सक्षम आणि संयमी नेते त्यांनी अध्यक्षपदाचे नेतृत्व करावे – अशोक चव्हाण

ग्लोबल न्युज नेटवर्क: