राहुल गांधी सक्षम आणि संयमी नेते त्यांनी अध्यक्षपदाचे नेतृत्व करावे – अशोक चव्हाण
गांधी कुटुंबियांच्या व्यतिरिक्त व्यक्तीने काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळावी अशी भूमिमा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी घेतलेली आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली आहे.
पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झालं आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल मात्र तत्पूर्वी राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. असे सुद्धा मंत्री अशोक चव्हाण यांनी बोलून दाखविले.