माझ्या मित्राची उणिव प्रत्यक्षाने जाणवत आहे, अरुण जेटलींच्या आठवणीत पंतप्रधान झाले भावुक….!

माझ्या मित्राची उणिव प्रत्यक्षाने जाणवत आहे, अरुण जेटलींच्या आठवणीत पंतप्रधान झाले भावुक….!

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्यावर्षी याच दिवशी अरुण जेटली यांनी जगाचा निरोप घेतला होता. अरुण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. जेटलींच्या आठवणींनी मोदी भावूक झाले असून त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

गेल्या वर्षी या दिवशी आपण अरुण जेटलीजी यांना गमावलं. मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अरुण जेटली यांनी मनापासून भारताची सेवा केली. त्यांची बुद्धि, कायदेशीर कौशल्य आणि व्यक्तीत्वाने ते महान होते, असे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: