…ज्यांना मुलबाळ नाही त्यांना काय कळणार? नाना पटोले यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

 

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाले असून युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे केंद्र सरकारवर सर स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे. ‘ज्यांना मुले बाळे नाही अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाही’ असं वक्त्यव्य करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली. रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे परिस्थिती आता आणखी चिघळत चालली आहे. अशातच हजारो भारतीय विद्यार्थी अडकलेले आहे.

आज एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या धोरणावरून सडकून टीका केली आहे. ‘युक्रेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून आहेत. मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोललो त्यांचे व्हिडीओ पाहिले भारताच्या विदेश मंत्रालयाशी मी अनेकदा बोलले असून त्याच्या कडून कोणतेही प्रतिसाद मिळाले नाही, असं नाना पटोले म्हणाले.

मात्र ज्या प्रमाणे कोरोनामध्ये पाच राज्याचे निवडणुका दुसऱ्या लाटेत आल्या, तेव्हा भारताचे प्रधान सेवक ते प्रचारात व्यस्त होते आणि दुसरीकडे कोरोनाचे प्रेत गंगानदीत तरंगतांना दिसताच तेव्हा त्यांना जाग आली. त्याच प्रमाणे पुन्हा आता पाच राज्यांच्या निवडणुका सुरू झाल्या आणि या निवडणुकामध्येच युक्रेनमध्ये युद्ध सुरू होणार होते, असे रशियाच्या माध्यमातून सगळीकडे अल्टिमेट दिले जात होते. तेव्हा ही भारताचे प्रधान सेवक निवडणुकीत व्यस्त होते, अशी टीकाही पटोलेंनी केली.

तसेच पुढे बोलताना पटोले म्हणाले की, आम्ही सगळं बघून घेऊ. मात्र आज ज्यांचे मुलं त्याठिकाणी शिकत आहेत त्यांच्या कुटुबीयांवर काय वेदना होत असतील ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना काय ते कळणार नाही. मात्र केंद्रातील सरकार आपल्या देशातील लोक युक्रेनमधून आणण्यात कमी पडला आहे. हे सत्य आहे अशी टीका त्यांनी केली होती.

Team Global News Marathi: