खामगाव येथील ठोंबरे फार्म अँड नर्सरीला मिळाला कृषि विभागाचा शासकीय परवाना

खामगाव येथील ठोंबरे फार्म अँड नर्सरीला मिळाला कृषि विभागाचा शासकीय परवाना

बार्शी: बार्शी तालुक्यातील खामगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र रावसाहेब ठोंबरे यांनी 2016 साली ठोंबरे फार्म अँड नर्सरी नावाने शेंद्री येथे रोपवाटिका सुरू केली. आपल्या प्रमाणेच सर्व शेतकर्‍यांना उत्कृष्ट व उत्तम दर्जाची रोपे उपलब्ध व्हावी या उद्देशाने अनेक कृषि विद्यापीठे व नर्सरीना भेटी देऊन चांगल्या प्रतीची मातृवृक्ष रोपे विकत आणून त्यापासून ते स्वत: रोपे तयार करतात व कलम ही करतात.

शेंद्री येथे 15 एकर पेरु, खामगाव येथे 10 एकर सुपर गोल्डन सीताफळाची बाग असून त्याचेही ते चांगले उत्पन्न घेतात. ठोंबरे फार्म अँड नर्सरीमध्ये सीताफळ, पेरु, लिंबू व केशर आंब्याची रोपे उपलब्ध आहेत. वरील रोपांना नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा नर्सरी धारक परवाना प्राप्त झाला आहे. त्यामुळे ठोंबरे फार्म अँड नर्सरीमधून रोपे घेणार्‍या शेतकर्‍यांना शासकीय पावती मिळेल व त्याचा उपयोग शासनाच्या विविध उपलब्ध योजनांचे लाभ घेण्यासाठी होणार आहे.

पोखरा – नानाजी देशमुख कृषि संजीवनी, भाऊसाहेब फुंडकर योजना, एम.आर.जी.एस., इत्यादि अनेक योजनांना ही पावती चालते. सर्व शेतकर्‍यांनी शासकीय मान्यताप्राप्त नर्सरी मधूनच रोपे खरेदी करावी असे अवाहन राजेंद्र ठोंबरे करतात.

ग्लोबल न्युज नेटवर्क: