संजय राऊतांसारखा प्रवक्ता कुणाला मिळू नये, शिवसेनेचे मित्र संपवले; शिंदे गटाचा गंभीर आरोप

शिंदे गटाचे आमदार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार – दीपक केसरकर

 

राऊतांनी चारवेळा शिवसेना फोडणाऱ्या राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला फरफटत जाण्यात भाग पाडले, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे.

शिंदे गटाचे आमदार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील, असे दीपक केसरकारांनी स्पष्ट केलं ( MLAs Shinde camp ready floor test Say Deepak Kesarkar ) आहे.

मुंबई – बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याकडून बंडखोरांवर सातत्याने टीका केली जात आहे. तसेच, त्यांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले जात आहे. त्यावर आता बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आपलं मतं मांडलं आहे. आणखी एक दोन आमदार आमच्या गटात सहभागी होती. त्यांच्या पाठिंब्याने आमचे संख्याबळ 51 पर्यंत जाईल. आम्ही 3 ते 4 दिवसांत निर्णय घेऊन महाराष्ट्रात येऊ, असे केसरकरांनी स्पष्ट केलं आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील. मात्र, प्रथम एकनाथ शिंदे गटाला मान्यात द्यावी. आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत जाणार नाही, असेही केसरकरांनी म्हटलं ( MLAs Shinde camp ready floor test Say Deepak Kesarkar ) आहे.

 

 

 

बंडखोर आमदारांविरोधात बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. यावर एकनाथ शिंदे गटाकडून बोलताना दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्या सारखा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये, राऊतांनी शिवसेनेचे मित्र संपविले, असा घणाघाती आरोप केला आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी कोकण, सिंधुदुर्ग जिंकायचा आहे, असे म्हटलेले. मी जिंकलो. राणेंची दहशत नाहीशी केली. संजय राऊतांनी काय केले, असा सवाल दीपक केसरकर यांनी केला. तसेच राऊत म्हणतात की एका बापाचे असाल तर, हा महाराष्ट्राच्या महिलांचा अपमान आहे. याचा अर्थ काय होतो, हे शिवसेनेला चालते का? असा सवालही त्यांनी केला.

राऊतांनी चारवेळा शिवसेना फोडणाऱ्या राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला फरफटत जाण्यात भाग पाडले. मी राष्ट्रवादीतून आलो असे ते म्हणातात तर त्यांनी मेमरी नीट करावी, मी राष्ट्रवादीत आमदार होतो. तिथून इकडे आलो. राऊत म्हणतात हा पान टपरीवर जाईल तो भाजी विकेल, हा रिक्षा चालवेल. हे ऐकून शिवसेना आमदारांच्या डोळ्यात पाणी आले. कुठे ते प्रेमाने पाठीवर हात फिरविणारे बाळासाहेब कुठे हे, अशा शब्दांत केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली.

याच पान टपरीवाल्याने, भाजी विक्रेत्याने शिवसेना मोठी केली. एक आमदार तर लग्नाच्या आदल्या रात्री पर्यंत तुरुंगात होता. त्याच्या सासऱ्याने तो सुटला नाही तर त्याच्या फोटोसोबत मुलीचे लग्न लावून देण्याचे ठरविले होते. अशा लोकांनी शिवसेना उभी केली आहे. राऊत कुठेतरी लेख लिहत होते, ते माझ्यासारखेच बाहेरून आले आहेत आणि ज्यांनी शिवसेना वाढविली त्यांच्याविरोधात घाणेरडे, अपशब्द वापरत आहेत, असे केसरकर म्हणाले.

याचबरोबर केसरकर यांनी मनसेत शिंदे गट विलीन करत असल्याच्या चर्चा फेटाळून लावली. आम्हीच शिवसेना आहोत, यामुळे कुठल्या पक्षात विलिनीकरण करण्याची आम्हाला गरज नाही, असे केसरकर म्हणाले. आम्ही पुढील तीन चार दिवसांत महाराष्ट्रात येऊ, आम्ही फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी तयार आहोत, असेही केसरकर म्हणाले.

 

 

बंडखोर गट सर्वोच्च न्यायालयात – महाराष्ट्रात सुरू असलेला सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोचला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने सर्वोच्च न्यायलायात धाव घेतली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 आमदारांना अपात्र आणि गटनेता कारवाईसाठी पाठवलेल्या नोटीसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी ( 27 जून ) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

“आमचा महाविकास आघाडीला पाठींबा” – विजय उद्धव ठाकरेंचा होईल. चाळीस ते पन्नास आमदारांच्या बंडखोरींनी शिवसेनेवर परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती कशी सुधरता येईल, याचा निर्णय आम्हाला तेथेच घ्यायचा आहे. आसाममध्ये गेलेल्या शिवसेनेच्या काही आमदारांची वक्तव्य समोर आली आहेत. त्यातून स्पष्ट होते आहे की त्यांना सत्तापरिवर्तन हवं आहे. शिवसेनेला खात्री आहे त्यांची लोक परत येतील आणि त्यांच्या भूमिकेत बदल होईल. आमचा महाविकास आघाडीला पाठींबा आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: