ही प्रसिद्ध गायिका करणार लवकरच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाली होती. त्यात आता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा राष्ट्र्वादी पक्षात प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्र्वादीत प्रवेश केला होता.

आता त्या पाठोपाठ गायिका वैशाली माडे ह्या सुद्धा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ‘एबीपी माझा’ शी बोलताना ही माहिती दिली आहे. वैशाली माडे यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. वैशाली माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास मोठ्या संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. याशिवाय अनेक मराठी मालिकांची ‘टायटल साँग’ म्हाडे यांनी गायिली आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठी बिगबॉसमध्ये सुद्धा प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी प्रेक्षकांची माने जिंकून घेतली होती. तसेच त्यांना अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांत अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीत प्रवेश केला आहे.

Team Global News Marathi: