शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात अहमदाबाद येथे गुप्तभेट झाल्याचे वृत्त काल समोर आले होते. या भेटीवेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल सुद्धा शरद पवार यांच्या सोबत उपस्थित होते. तसेच भाजपचे नेते सुद्धा उपस्थित होते अशी माहिती समोर आली होती.

दिव्य भास्करच्या बातमीनुसार, पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही निवडक ज्येष्ठ नेते शुक्रवारी संध्याकाळी खासगी जेट विमानाने अहमदाबाद येथे गेले होते. त्यानंतर बंद दाराआड पवार, शहा आणि पटेल यांच्यात गुप्त बैठक झाली. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती. पण त्यात नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली ते मात्र कळू शकलेले नाही.

यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी यावर सावध भूमिका घेत प्रतिक्रिया दिलेली आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर चुकीचं काहीच नाही, असं संजय राऊत म्हणाले.

तसेच राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असो, असा टोला संजय राऊत यांनी अमित शाह यांना लगावला होता.

Team Global News Marathi: