इंस्टाग्राम रीलवर नेहा कक्करचे एक्सप्रेशन्स पाहून युजरने केली कमेंट; म्हणाले, ‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका म्हणून सध्या बहुचर्चित असणारी नेहा कक्कर सध्या एक पंजाबी गाणं घेऊन आली आहे. नेहा कक्करने तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

नेहा कक्करने ‘खड तैनू मैंं दस्सा’ या गाण्यावर व्हिडिओ बनवत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. नेहाच्या या इंस्टाग्राम रीलला ५ लाखांपेक्षाही जास्त वेळा बघितले आहे. तसेच तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

https://www.instagram.com/reel/CPCgiLBjN0v/?utm_medium=share_sheet

याच सोबत हा व्हिडिओ बघताच काहीजण तिला ‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान,’ असे म्हणत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये हावभाव करून नेहा लोकांना तिच्या सोबत डुएट करायला सांगत आहे.

दरम्यान, अगम अजीम यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. तर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी हे गाणे गायले आहे. आणि रजत नागपाल यांनी या गाण्याला संगीत दिले आहे, तर कप्तान यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत.

Team Global: