मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जावे, जनता त्यांना कोल्हापूरी चप्पल दाखवतील -प्रवीण दरेकर

 

            फडणवीस आणि दरेकर यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करताना मंत्री मालिक म्हणाले की, दरेकर आणि फडणवीस फिरत असताना दोघांचे एकसारखेच होते. बूट एकसारखे घालतात, बूट खरेदी करतात, बूट नवे खरेदी करावे लागतात. यांचे बूट Nikeचे की Pumaaचे आहेत हे ठाऊक नाही पण दौऱ्यावर हे दोघे नेते नटून जात आहेत अशी टीका मलिक यांनी केली होती. आता मलिक यांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

            नवाब मलिक विरोधी पक्षाच्या कोकणातील पाहणी दौऱ्यावर टीका करतात. मलिक आमच्या बुटांबाबत विधान करतात. आम्ही बुट घातले की सुट घातले, हे नवाब मलिक सांगतात. आम्ही पाहणी करायची आणी यांनी घरात बसून राहायचे, यापेक्षा लोकशाहीची थट्टा असू शकत नाही. नवाब मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी. कोकणातील जनता तुम्हाला कोल्हापुरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढा संताप कोकणातील जनतेच्या मनात असल्याचे दिसून आले, अशा शब्दात दरेकर यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला.

             मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते वैफल्यग्रस्त असल्याचं म्हटलं. आम्ही वैफल्यग्रस्त असूही. पण आज कोकणची जनता चिंतेत गर्क आहे. त्यांची चिंता दूर करा. नाही तर कोकणच्या जनतेत जे वैफल्य येईल त्याने तुमची दाणादाण उडेल, हेच आमचं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, असा टोलाही दरेकरांनी लगावला होत. आता दरेकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: