कोरोना मृतांच्या आकडेवारीत ठाकरे सरकार लपवाछपवी करत आहे – किरीट सोमय्या

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. त्यात ठाकरे सरकार कोरोना मृतांच्या आकडेवारी वरून खोटी माहिती देत असल्याचा आरोप पुन्हा एकदा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी ट्विट करत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारकडून कोरोना मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

देशातील कोरोना संसर्ग संख्येत महाराष्ट्रात सर्वाधिक लागण झालेले रुग्ण असल्याचे गेल्या काही सलग दिवसांपासून दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांसाठी कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे.

१ ते १३ एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत. आयुक्त म्हणतात खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, सुधार करू, असे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे काहीतरी गोलमाल असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Team Global News Marathi: