सत्ता आल्यावर सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे गेले कोठे? – राजू शेट्टी

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवारांच्या प्रचारासाठी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी आलेले असताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच आघाडी ससरकारवर सुद्धा ताशोरे ओढले आहेत.

राज्यात सत्ता आल्यावर पाहिले काम शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांचा सात-बारा का कोरा केला नाही. आता ते कोठे गेले असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री मुंबई मधून बाहेर पडत नाहीत उपमुख्यमंत्री कुणाचे ऐकत नाही अशी गत या सरकारची झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की या राज्यातील गरीब जनतेसाठी या सरकारने काय केले. ऊस तोडणी मजुरांसाठी काय केले. हमाली करणाऱ्यांसाठी काय केले. या सरकारने यांचा विचारच केला नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी महिला विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा राज्य सरकारने का मदत केली नाही.

शेतकऱ्यांच्या जिवालाच्या प्रश्नावर तुम्ही का बोलत नाहीत. एकदा मतदान झाले की लॉकडाउन लागू करणार. शेतकऱ्यांची लाईट कट केली जाणार. दुधाचे, डाळींबाचे ,द्राक्षाचे या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही अशी टीका यावेळी शेट्टी यांनी केली होती.

Team Global News Marathi: