विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची – संजय राऊत

 

पालिकेच्या विक्रोळी टागोर नगर सीबीएसई मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण संजय राऊत यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले यावेळी महापौर किशोरीताई पेडणेकर सुद्धा उपस्थित होत्या. आज समाजात विविध उच्च पदांपर्यंत पोहोचलेल्या अनेक महान व्यक्तींचे शिक्षण मुंबई महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षण विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

शाळेच्या रिक्त भूखंडाचा वापर डंपिंग ग्राऊंड म्हणून केला जात असताना शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी शाळेची उभारणी करून एक प्रकारे स्वर्गच निर्माण केल्याचे गौरवोद्गारही यावेळी संजय याऊत यांनी काढले.
शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झालेली ही जुनी नगरसेवक मंडळी नागरिकांच्या हक्कासाठी व चांगल्या सुविधा देण्यासाठी झटत असल्याचेही ते म्हणाले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या शिक्षण विभागात अनेक आमूलाग्र बदल होत आहेत. आता सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रमही सुरू झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी जगात कुठल्याही शाळेत कमी पडणार नाही, असा विश्वासही खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. भविष्यात मुंबई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असल्याने या ठिकाणच्या तुकडय़ांची संख्या वाढवण्याची सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली.

Team Global News Marathi: