मंत्री बदलल्यास लसी मिळणार का? पुन्हा राहुल गांधी यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा |

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून काही नवीन चेहऱ्यांवर खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना सुद्धा डच्चू देण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून जोरदार टीका सुद्धा केंद्रावर करण्यात आली होती.याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

आरोग्यमंत्री बदलल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सवाल करत सरकारवर तिरकस निशाणा साधला आहे.
याचा अर्थ यापुढे लसीची कमतरता भासणार नाही का, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. तसेच सरकारने आरोग्य मंत्री बदलले याचा अर्थ करोनाचा लढा लढण्यास सरकारला आलेल्या अपयशाची कबुलीच दिली आहे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस पक्षाकडून व्यक्त करण्यात आली होती.

सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर आणि त्यात नसलेल्या पारदर्शकतेवर कॉंग्रेसकडून सातत्याने बोट ठेवले जाते आहे. राज्यांना ज्या प्रमाणात लसींचे डोस हवे आहेत त्या प्रमाणात ते उपलब्ध होत नसल्याची सर्वच राज्यांची ओरड आहे. मात्र सरकारने असे का केले जाते आहे याचे थेट उत्तर देण्याचे आतापर्यंत टाळले आहे.

Team Global News Marathi: