श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडच्या इक्विटी शेअरचा सार्वजनिक प्रस्ताव 14 जून 2021 रोजी खुला

  मुंबई |  श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने इक्विटी शेअरचा प्रारंभिक सार्वजनिक बोली/प्रस्ताव खुला करण्यात येणार आहे. हा व्यवहार सोमवार, १४ जून २०२१ रोजी होणार असून बोली/प्रस्ताव बुधवार, १६ जून २०२१ रोजी बंद होणार आहे. या प्रस्तावाचा किंमत पट्टा प्रती इक्विटी शेअर रु. ३०३ – रु. ३०६ याप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. कंपनी आणि विक्रेते समभागधारकांनी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) यांच्या सल्ल्यानुसार पायाभूत गुंतवणुकदारांचा सहभाग लक्षात घेतला असून त्यांचा सहभाग बोली/प्रस्ताव खुला होण्याअगोदर एक कार्यालयीन दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवार, ११ जून २०२१ रोजी असणार आहे.

 

या प्रस्तावाचा एकूण आकार रु. ९०९ कोटीएवढा असून यामध्ये ताजा रु. ६५७ कोटींच्या इक्विटी शेअरचा समावेश असेल आणि विक्रेत्या समभागधारकांकडून इक्विटी शेअरची ऑफर फॉर सेल सरासरी रु. २५२ कोटींची राहील. ताज्या प्रस्तावातून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग कंपनी स्वत:चे तसेच उपकंपन्या, श्याम एसईएल आणि पॉवर लिमिटेडची रु. ४७० कोटी कर्जाचा पुनर्भरणा किंवा आगाऊ भरणा करण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी करेल.
हा समूह इंटरइमीजीएट आणि लॉंग स्टील उत्पादने जसे की आयरन पॅलेट, स्पंज आयरन, स्टील बायलेट, टीएमटी, रचनात्मक उत्पादने, वायर रॉड आणि फेर्रो अलॉय उत्पादनांचा उत्पादक आहे. त्याचे लक्ष विशेष स्टील वापराकरिता लागणारी हाय मार्जिन उत्पादने जसे की, कस्टमाईज बायलेट व विशेष फेर्रो अलॉयवर आहे.

सध्या हा समूह आपल्या उत्पादन प्रकारांत वाढ करत असून पिग आयरन, ड्क्टल आयरन पाईप आणि अॅल्युमिनियम फॉईलमध्ये प्रवेश करतो आहे. या समुहाची प्रमुख क्षमता स्टील वॅल्यू चेन आणि ओडिशा तसेच पश्चिम बंगाल येथील रणनीतीत्मक निर्मिती प्रकल्पांमधील एकात्मिक कामकाजांवर केंद्रित आहे. पूर्व भारतामधील ही ठिकाणे रेल्वे, रस्ते मार्ग आणि बंदरांनी चांगल्याप्रकारे जोडलेली आहेत. रेल्वे सायडिंग आणि वीज प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचा आधार लाभलेला आहे. ज्याचा वापर कंपनीच्या कामांसाठी करण्यात येतो.

या समूहाच्या संभळपूर तसेच जामुरीया निर्मिती प्रकल्प फॉरवर्ड व बॅकवर्ड इंटीग्रेटेड आहेत. हा समूह स्टील वॅल्यू चेनमध्ये उपस्थित असून वैविध्यपूर्ण प्रोडक्ट मिक्स देऊ करतो. त्याच्या व्यापारी रणनीतीला साजेसे ठिकाण लाभले आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत समूहाच्या वीज प्रकल्पात उत्पन्न झालेल्या वीजेपैकी एकूण ७९.५८%  वीज कंपनीने वापरली. ३१ डिसेंबर २०२० अनुसार या कंपनीचे भारतभर १३ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात ४२ वितरकांचे वितरण जाळे होते. समूहाच्या स्थानिक ग्राहकांत जिंदाल स्टेनलेस (हिसार) लिमिटेड, आणि रिमझिम इस्पात लिमिटेड तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांमध्ये नोरेकॉम डीएमसीसी, नोरेकॉम लिमिटेड, पॉस्को इंटरनॅशनल कॉर्पोरेशन, वर्ल्ड मेटल्स अँड अलॉय (एफझेडसी), ट्राक्सीज नॉर्थ अमेरिका एलएलसी, जेएम ग्लोबल रिसोर्सेस लिमिटेड, गोयंका स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विजयश्री स्टील प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, एक्सिस कॅपिटल, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे प्रस्तावाचे बीआरएलएम आहेत. हा विक्री व्यवहार बुक बिल्डींग प्रोसेसद्वारे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस (नियमन) नियम १९५७ च्या  १९(२)(बी) मधील सुधारणा (“SCRR”) सह नियमन ३१/ सेबी आयसीडीआर नियमन ६(१) सेबी आयसीडीआर नियमन आणि अनुपालनासह वाचा,  सेबी आयसीडीआर नियमनानुसार, विना-संस्थात्मक बोलीकर्ते (नॉन इन्स्टीट्युशनल बीडर्स)’ना १५% पेक्षा जास्त रकमेचे वाटप करता येणार नाही आणि इश्यूच्या ३५% हून अधिकचे वाटप वैयक्तिक रिटेल बोलीकर्ते (रिटेल इंडीविज्युअल बीडर्स)ना करता येणार नाही, वैध बोली प्रस्ताव किंमत/इश्यू प्राईज इतकी किंवा त्यावर राहील.  त्याशिवाय प्रस्तावाचा ३००,००० इक्विटी शेअर भाग, जो आमच्या कंपनीच्या प्रस्ताव-पश्चात इक्विटी शेअर भांडवलाच्या ५% भाग हून अधिक नसावा, तो पात्र कर्मचारी वर्गासाठी प्रमाणबध्द आधारावर वाटप करण्यासाठी उपलब्ध असेल.

Team Global News Marathi: