प्राजक्ता माळीने पावसात भिजणाऱ्या ‘त्या’ पोलिसाचा व्हिडिओ केला व्हायरल आणि म्हणाली..

मुंबई । एकीकडे कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असतानाच, दुसरीकडे मात्र तौक्ते चक्रीवादळाने लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मात्र या सर्वांमध्ये ऊन, वारा, पाऊस न बघता पोलीस आपले कर्तव्य बाजावत आहेत. असेच भर पाऊसात एक पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतानाचा एक व्हिडिओ अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने शेअर केला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात भर पावसात मुंबई पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना दिसत आहेत. या मुसळधार पावसात त्यांच्याकडे ना छत्री आहे, ना रेनकोट, पण या सगळ्याची कोणतीच पर्वा न करता ते भर पावसात उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत.

तसेच प्राजक्ताने शेअर केलेल्या विडिओ खाली “आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे.” असे म्हणत तिने पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच “कोणत्याही संकटकाळी मुंबई पोलीस नेहमीच खंबरपणे उभे राहून, लोकांची सेवा करत आहेत.” असेही कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या कठीण काळातही पोलीस आपल्या ड्यूटीवर, सतत लोकांच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. या काळात पोलिसांचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

Team Global: