नव वधूने नवऱ्याच्या मारली कानशिलात; आणि पुढे जे घडले, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

नवी दिल्ली । आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. यामध्ये अनेक भाषा, रूढी, परंपरा आपल्याला पहायला मिळतात. एवढेच काय तर प्रत्येक मैलावर भाषा बदलते त्याच प्रमाणे तेथील प्रथासुद्धा वेगळ्या असलेल्या पहायला मिळतात.

अशीच काहीशी एक आगळीवेगळी प्रथा एका वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरा-नवरीचे अनेक आगळेवेगळे खेळ खेळले जातात. मात्र या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खेळला जाणार खेळ जरा हटकेच आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, नवरदेव एका ठिकाणी बसला असून त्याच्या आजूबाजूला काही भेटवस्तू आहेत आणि त्याची बायकोही दिसत आहे. नववधू आपल्या पतीला नवनवीन भेटवस्तू दाखवत असते आणि भेटवस्तू दाखवता-दाखवता त्याची नजर चुकवून नवऱ्याच्या कानशिलात लगावते.

जेव्हा ती चतुराईने कानाखाली लगावते तेव्हा नवरदेव तिचा हात पकडतो. मात्र कानशिलात मारून पळण्याच्या नादात दोघांंमध्ये झटापट झालेली दिसत आहे. या झटापटीत दोघेही खाली पडलेेले आपल्याला दिसतात. हे सर्व होत असताना खेळ पहायला आलेले आजूबाजूचे आणि घरातले हसताना दिसत आहेत.

दरम्यान, लग्न झाल्यानंतर महाराष्ट्रात अंगठी शोधणं, एकमेकांच्या तोंडात पदार्थ ठेवून खायला लावणे हे खेळ खेळले जातात.

Team Global: