बीडीडी चाळ रहिवाश्यांच्या मागण्या अखेर मान्य, मंत्री डॉ. जीतेंद्र आव्हान यांनी दिले आश्वासन

 

मुंबई | अनेक वर्षापासून रखडलेला बीडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार असल्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी रहिवाशांना दिले आहे. त्यामुळे आता हा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागून या प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आज तागायत मागण्या पूर्ण झाल्याशिवाय सर्वे करून देण्यात नाही अशी भूमिका सर्व बीडीडी रहिवाशांनी घेतली होती, तसेच गृहनिर्माण मंत्र्यांना फिरकू देणार नाही, अशी धमकीही चाळरहिवाशांकडून देण्यात आली होती.

त्यामुळे बीडीडी चाळवासीयांशी चर्चा करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड खुद्द ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीत आले. आधी करारनामा मगच पुनर्विकास, अतिक्रमण व निष्कासन विभागाचा सव्र्हे तसेच १९९६ च्या आधीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्या यावेळी चाळवासीयांच्या वतीने अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी मांडल्या.

या सर्व मागण्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून करण्यात आल्याचा दावाही डॉ राजू वाघमारे यांनी केला होता. मात्र या मागण्या आव्हाड यांनी मान्य करून याबाबत लवकरात लवकर राज्य सरकार निर्णय जारी करेल, असे आश्वासनही त्यांनी चाळ रहिवाशांना दिले. याशिवाय इतर सर्व मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असेही स्पष्ट केले. आव्हाड यांच्या या निर्णयामुळे अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघाच्या अनके वर्षाच्या लढ्याला यश आले आहे अशी भावना संघाचे अध्यक्ष राजू वागमारे यांनी मांडली आहे.

Team Global News Marathi: