धक्कादायक माहिती | मंत्रालय बॉम्ब प्रकरणातील आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी

मुंबई | मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ई-मेलद्वारे त्यानं ही धमकी दिली होती. पुण्यात घोरपडीमधून या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. मात्र सदर आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचा खुलासा झाला आहे. काही दिवसांपुर्वी शैलेंद्र शिंदे नावाच्या व्यक्तीने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल गृह विभागाला केला होता.

 

या निनावी मेलमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यावर ही केवळ अफवा असल्याचं समजलं. मुंबई मंत्रालय बॉम्ब प्रकरणातील आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी आहे. शिंदे यांनी मंत्रालयात १५० मेल केले होते मात्र त्यावर उत्तर न आल्याने धमकीचा मेल केला. शैलेश शिंदे याला पुणे पोलिसांनी अटक करून काल मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. शिंदेच्या मुलाला शाळेत ऍडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागालाही धमकीचा मेल केला होता.

 

शिंदे हे पुण्यातील घोरपडीच्या बि.टी.कवडे रोड परिसरातील इस्टर्न कोर्ट या इमारतीत राहतात. शैलेश शिंदे सध्या शहरात जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय.  भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या घरच्यांनी जो पर्यंत त्यांना पोलीस घरी सोडत नाही तोपर्यंत आम्ही बोलणार नाही असं सांगितलं आहे. यावर आता भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

 

 

 

Team Global News Marathi: