मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनेदेखील जबाबदारी घ्यावी – राहुल शेवाळे

 

मुंबई | लढवय्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असून केंद्र सरकारनेही याबाबत आपली जबाबदारी नियमानुसार पार पाडावी, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. नियम 377 अन्वये खासदार शेवाळे यांनी, मराठा आरक्षणसंदर्भात आपले निवेदन सभागृहात सादर केले.

आपल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने तीन वर्षांपूर्वी दिलेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे आता संविधानिक तरतूद करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी संसदेत दिली होती.

यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकरवी अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल संसदेतही सादर केला जाईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. केंद्र सरकारनेही मराठा आरक्षणासाठी नियमानुसार योग्य ती जबाबदारी पार पाडावी.

Team Global News Marathi: