केंद्राचे पथक आता येणं म्हणजे ‘पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं’; रोहीत पवारांचा टोला

केंद्राचे पथक आता येणं म्हणजे ‘पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं’; रोहीत पवारांचा टोला

मुंबई – ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली होती. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला तब्बल २ महिन्यानंतर केंद्रीय पथक आले आहे. २१ ते २६ डिसेंबर याकाळात हे पथक नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणाराय. हे पथक मराठवाड्यात दाखल झाले असून, सोमवारी या पथकानं ३ जिल्ह्याची पाहणी केली. यामध्ये औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद या जिल्ह्याचा समावेश आहे. मात्र, त्यांच्या या कृतीवर काही नेत्यांनी चांगलीच टीका केली आहे.

शेततकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होऊन २ महिने झाले आहेत. मात्र, केंद्रीय पथकाला उशीरा जाग आली आहे. त्यामुळं केंद्राच्या या कृतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे. आता पथक शिवारात जाऊन काय बघणार? असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी २ महिन्यांनी आलेलं केंद्राचं पथक म्हणजे ‘पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं’, असा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी केली. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये, आता पथक नको मदत पाठवा’, अस ट्विट करत रोहित पवारांनी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1341027852787961856?s=19

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. यामुळं राज्यातील ४१ लाख हेक्टर क्षेत्राचं नुकासान झाले असून, आम्ही केंद्राला तीनवेळा विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान केंद्र सरकारचे पथक दाखल झाले नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.

दरम्यान, केंद्राच्या पथकाने आता पहाणी करुन काहीही फायदा नाही. दोन महिन्यांपूर्वी जो कापूस खराब झाला होता तो आता भुईसपाट झाला. बाजरीचं पीकं काढून आता लोकांनी गहू पेरलाय. त्यामुळं या पथकाला नुकसान कसं दिसणार? असा प्रश्न औरंगाबादच्या काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीची सफाई करुन हरभरा, ज्वारीची पेरणीदेखील केलीय. त्यामुळं आता हे पथक शिवारात जाऊन नेमकं काय बघणार असा उपस्थित केला जातोय.

ग्लोबल न्युज नेटवर्क: