धक्कादायक: लॉकडाऊनमुळे सोशल मीडियाचं व्यसन वाढलं

लॉकडाऊनमुळे सोशल मीडियाचं व्यसन वाढलं

ग्लोबल न्यूज: लॉकडाऊन मध्ये अनेकांना सोशल मीडियाचं व्यसन जडल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यात नागपूरमध्ये मेयो हॅास्पिटलमध्ये गेल्या सात-आठ महिन्यात सोशल मीडिया ॲडिक्शनचे ५० ते ६० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. अशी धक्कादायक माहिती मनोविकृती विभागाच्या डॅाक्टरांनी दिली आहे.

या सर्व घटनांमध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचे व्यसन जडलेल्याने मानसिक विकृती आलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असायची धक्कादायक माहिती मनोविकार डॉक्टरांनी दिलेली आहे.

जगभरात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, लोक हातात मोबाईल घेऊन तासंतास सोशल मीडियावर घालवतात. पण आता अमेरिकेतील आर्कान्सा विद्यापीठाच्या संशोधनातून धक्कादायक तथ्य पुढे आलंय. सोशल मीडियाच्या अतिवापराने सहा महिन्यात नैराश्य येते, असे आर्कान्सा विद्यापीठाच्या संशोधनात पुढे आलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया जपून वापरण्याची आज गरज आहे.

गेल्या काही दिवसांपासून घरी पती-पत्नी एक दुसऱ्यांना कमी आणि मोबाईलवर, सोशल मीडियाला जास्त वेळ देत असल्याचे दिसून आले आहे. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलच्या आकडेवारीनुसार ३० टक्के संसारात मोबाईल-सोशल मीडिया विष कालवत आहे. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे दरवर्षी सव्वादोन हजाराच्या आसपास घरुगुती भांडणाचे खटले येतात. त्यापैकी ३० टक्के कुटुंबाच्या सुखी संसारात मोबाईल आणि सोशल मीडिया व्हिलन असल्याचं दिसून येत असल्याची माहिती समोर आली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: