ठाण्यात नियम धाब्यावर बसवून ऑर्केस्ट्रा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट सुरु ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 

ठाणे | ठाण्यातील डान्स बार प्रकरण दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या चांगले अंगाशी आले असताना मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल पंधरा बार सील करण्यात आले. ठाणे महापालिकेने ही कारवाई केली असून शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर या बारना टाळे ठोकण्यात आले.

शहरात ऑर्केस्ट्रा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट (डान्स) सुरू असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना मिळताच त्यांनी याबाबत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती चार पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित ऑर्केस्ट्रा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला.

पोलिसांनी या प्रकरणात संबंधित बारवर गुन्हा दाखल करत त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी महसूल विभागाला विनंती केली असून त्यांचे बार सील करण्याचे निवेदन ठाणे महानगरपालिकेला देण्यात आले होते, याची तातडीने दखल घेत ठाणे महानगरपालिकेने ठाण्यात सुरू असलेल्या 15 लेडीज बारवर कारवाईचा धडाका लावला.

राज्यात सामान्यांसाठी लागणाऱ्या गोष्टी आणि उद्योगांवर बंदी असूनही हे डान्सबार राजरोसपणे सुरू होते. स्थानिक प्रशासनाला याची कुणकुणही नव्हती का? असा सवाल आता विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जातोय. इतकंच नाही तर ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना निलंबित करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर फक्त पोलिस विभागावर नाही तर इतर संबंधित विभाग आहेत. त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्याची मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे.

Team Global News Marathi: