कोरोना काळात लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत

 

मुंबई | सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व सणांवर काही निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्यात मुंबईच्या मानखुर्द येथील देवनार कत्तलखान्यात बकरी ईदसाठी जनावरांची कत्तल करण्याच्या मर्यादेत वाढ करावी. अशी मागणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. तसेच बकरी ईद निमित्त परवानगी देणाऱ्या भिवंडी निझामपूर महापालिकेला खडेबोल सुनावले आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांच्या जीवापेक्षा कुठलाही धार्मिक सण महत्वाचा नाही असं हाय कोर्टाने स्पष्ट केलं आहे. तर अशी टिपणी दिली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, भिवंडी निझामपूर महापालिकेला दणका देत बकरी ईद निमित्त ३ दिवसांसाठी तात्पुरते कत्तलखाने सुरू करण्यास दिलेल्या परवानगीला स्थगिती दिली आहे.

मुंबई हाय कोर्टात बकरी ईद निमित्त देवनार कत्तलखान्यात मोठ्या जनावरांची कत्तल करण्याविषयी मुंबई पालिकेनं अधिकाधिक ३०० गुरांची मर्यादा वाढवून हजार अथवा किमान सातशे करावी अशी विनंती करत ऑल इंडिया जमैतुल कुरेश यांच्यावतीनं जनहित याचिका दाखल केली होती. यावर कोर्टात आज सुनावणी झाली. त्यावेळी सद्यास्थिती पाहता सार्वजनिक आरोग्य हे कोणत्याही धर्मापेक्षा महत्वाचं आहे का? असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला होता.

Team Global News Marathi: