टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन

 

उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास अहमदाबात येथून मुंबईच्या दिशेने जात असताना सूर्या नदीच्या पूलावर हा अपघात झाल्याची माहिती पालघरच्या पोलीस अधीक्षकांडून देण्यात आली.

आपल्या मर्सिडिज कारमधून सायरस मिस्त्री प्रवास करत असल्याचं समोर आली आहे. त्यांची गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं म्हटलंय. आपल्याला अद्यापही यावर विश्वास बसत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

सायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री यांचे सुपुत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमधघून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंपीरिअल कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. २००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सदस्य बनले. त्यानतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. याशिवाय सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टरही होती. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता.

Team Global News Marathi: