किचनमधील फरशीचं काम करत होतं कपल, सापडली 2 कोटी रूपयांची सोन्याची नाणी

यूनायटेड किंगडममधील एका कपलला घरातील काम करत असताना किचनच्या फरशीखाली सोन्याची नाणी सापडलीत. ही सोन्याची नाणी 400 वर्ष जुनी आहेत. 264 सोन्याच्या नाण्यांचं हे कलेक्शन 400 वर्षांपेक्षा अधिक जुनं आहे. हा खुलासा तेव्हा झाला जेव्हा ते उत्तर यॉर्कशायरमधील घरात काही काम करत होते. कपल आता ही नाणी सव्वा लाख पाउंडला विकत आहेत. कपलला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की, ते ज्या घरात अनेक वर्षांपासून पाहत आहेत त्यांना तिथे खजिना मिळेल.

कपलला जराही अंदाज नव्हता की, किचनच्या फरशीखाली असं काही असेल. हे त्यांच्यासाठी फारच आश्चर्यकारक होतं. त्यांनी विचार केला होता की, त्यांच्या 18व्या शतकातील घरातील कॉंक्ट्रीटच्या जमिनीखालील विजेचे तार खराब झाले असतील. जसं त्यांनी घरातील फरशी रिनोवेट करणं सुरू केलं. तेव्हा त्यांना असं काही दिसलं ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. कदाचित नशीब चमकणं यालाच म्हणतात. त्यांना सोन्याची नाणी असलेलं एक भांड सापडलं.

जेव्हा तज्ज्ञांनी या वस्तूचं परिक्षण केलं तेव्हा त्यांना समजलं की, ते 2.3 कोटी रूपयांवर राहत आहत. ‘द सन’ ने सांगितलं की, ही नाणी 1610 ते 1727 दरम्यानचे आहेत. या काळात जेम्स फर्स्ट आमि चार्ल्स फर्स्ट यांचा शासनकाळ होता. या कपलने लगेच लंडनमधील लिलाव करणारी संस्था स्पिंक अॅन्ड सनला बोलवलं. तेव्हा ते हे कलेक्शन बघण्यासाठी त्यांच्या घरी गेले.

लिलावकर्ता ग्रेगरी एडमंडच्या हवाल्याने द सनने सांगितलं की, ‘260 नाण्यांचा हा शोध ब्रिटनच्या पुरातत्वाच्या रेकॉर्डवर सर्वात मोठ्या शोधांपैकी एक आहे. हा पूर्णपणे आश्चर्यकारक शोध होता. मालक त्यांच्या घरातील फरशी रिनोवेट करत होते. तेव्हा त्यांना एक भांड आढळलं. ज्यात सोन्याची नाणी भरली होती.

साभार ऑनलाइन लोकमत

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: