तारक मेहता टीमच्या आणखी एका सहकलाकाराला कोरोनाची लागण

तारक मेहता या कार्यक्रमातील आणखी एका कलाकाराला कोरोनची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी नियमांचे कडक पालन करून शूटिंग करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती, तरीही अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते.

त्यातच काहीच दिवसांपूर्वीच या शोमध्ये दयाबेनच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मयुर वकानी यांनी करोना झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर या शोमधील आणखी एका कलाकाराची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने टीमच्या चिंतेत वाढ झाली आहे.

‘तारक मेहता’ शो’मध्ये भिडें यांची भूमिका साकारणारे अभिनेता मंदार चांदवडकर यांना करोनाची लागण झाली आहे. मंदार चांदवडकर यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी कुटुंबासह स्वतःला घरीच क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत.

माझे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र त्याआधी मला याची कोणतीही लक्षण दिसली नव्हती. हे एसिप्म्टोमॅटिक आहे. मी योग्य ती सर्व काळजी घेत आहे. मनपाने ने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन मी करत आहे. माझं आरोग्य ठीक आहे. माझे करोना रिपोर्ट येण्याआधीच मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं होतं. अशी माहिती एका खाजगी वृत्त वहिनीला दिली आहे.

Team Global News Marathi: