देशभरातील सर्वाधिक रुग्ण नागपूर आणि पुण्यात, राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर

देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात अनलॉक परिस्थिती, वाढलेली गर्दी, ठिक-ठिकाणी होणारा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, विनामास्क वावरणे नागरिक यांसह इतर कारणांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झालेली पाहायला मिळत आहे.

तसेच राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाद होताना दिसत आहे. रुग्णांचा चढता आलेख पाहून राज्य सरकार तसेच आरोग्य विभागाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. यामुळे राज्य सरकारकडून ठिकठिकाणी निर्बंध लावले जात आहेत.

काल दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाचे तब्बल २५ हजार ६८१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २१ लाख ८९ हजार ९६५ इतकी झाली आहे. तर काल राज्यात कोरोनामुळे ७० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण ५३ हजार २०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे शासनाने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारीही संख्या ठेवा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे.

Team Global News Marathi: